तिसंगी येथील पेट्रोल पंप असून अडचण नसून खोळंबा

साळवण : तिसंगी (ता. गगनबावडा) येथील भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप मागील पाच ते सहा दिवसापासून बंद असल्याने पेट्रोल आणि डिझेलसाठी वाहनधारकांसह शेतकरी वर्गाची मोठी कुचंबना झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती कामे खोळंबली आहेत. वाहनधारकांना पर्यायी साधनांचा अवलंब करावा लागत आहे.

कळे ते गगनबावडा महामार्गानजीक तिसंगी येथील पेट्रोल पंप बंद असल्याने वाहनधारकांना कळे किंवा गगनबावडा येथे पेट्रोल व डीझेल भरण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे गगनबावडा व कळे येथे इंधन भरण्यासाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.