वसंत मुळीक यांनी सकल मराठा समाज काँग्रेसच्या दावणीला बांधला : राजेश क्षीरसागर

सकल मराठा समाज यांच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे मराठा समाजातील व्यवसाईक, कामगार व शेतकरी यांचा मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व प्रमुख उपस्थिती सौ.वैशालीताई क्षीरसागर यांची उपस्थिती होती. प्रथम मराठा मुख्य समन्वयक संजयसिंह साळोखे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी विविध स्तरामध्ये कार्यरत असलेल्या १० दापत्यांचा सत्कार राजेश क्षीरसागर व सौ.वैशालीताई क्षीरसागर यांचे हस्ते करणेत आला.

या मध्ये सौ व श्री. धनाजी पाटील, विजय दळवी, वसंतराव चौगुले, संभाजी पाटील, नागेश माने,बापुसो चौगुले, रणजित गाहिरे, दीपक जगताप, सौरभ पाटील, श्रीमती शारदा चव्हाण, श्रीमती राधाबाई सातपुते यांचा सत्कार करणे आला. मराठा समाजाच्या कार्यासाठी सतत प्रयत्नशिल असणारे राजेश क्षीरसागर यांचा जरीटोप व कवड्याची माळ देवून सत्कार मराठा बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष प्रसन्न शिंदे यांनी केला. मराठा मुख्य समन्वयक उदय लाड यांनी सांगितले की, बरेच वर्षे कॉंग्रेस सत्तेत असूनही मराठा समाजासाठी १% आरक्षण देवू शकले नाही.शरद पवार यांनी मराठा समाजासाठी काहीही केले नसून मराठा समाजाचे आरक्षण कमी केले आहे. सकल मराठा समाजा कडून कोणत्याही उमेदवारांना पाठींबा द्यावयाचा नाही असे ठरले असताना मुळीक यांनी कॉंग्रेस उमेदवाराना पाठींबा दिला.

किशोर घाटगे यांनी सांगितले की, शासनाकइन १०% आरक्षण मिळाले आहे. त्याची अम्मल बजावणी सुरु आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना दिलेले कोर्टामध्ये टिकेल असे आरक्षण दिलेले असून याचा लाभ मराठा समाजास नोकरी व शिक्षणामध्ये होणार आहे. दादासाहेब देसाई यांनी सांगितले की वसंतराव मुळीक यांनी मराठा भवन अजून ही बांधलेले नाही.सकल मराठा समाज काँग्रेसच्या दावणीला बांधला आहे.सकल मराठा समाजा कडून कोणत्याही उमेदवारांना पाठींबा द्यावयाचा नाही असे ठरले असताना मुळीक यांनी कॉंग्रेस उमेदवाराना पाठींबा दिला.

अध्यक्षीय भाषणात राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की मराठा भवन बांधणेची मागणी मराठा समाजा कडून आमचेकडे होत आहे म्हणून आम्ही कोल्हापूर मध्ये मोठ्या मा. एकनाथ शिंदे यांचेकडे पाठपुरावा करून प्रशस्त जागेत मराठा भवन लवकरच बांधणार असलेचे सांगितले.यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणार असलेचे सांगितले. मराठा समाजातील युवक व युवती उच्च पदावर जाऊन देशाची व राज्याची सेवा करतील असेही सांगितले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात मराठा समाज हजर होता. आभार प्रदर्शन विक्रमसिहं जरग यांनी केले.

यावेळी प्रसन्न शिंदे-शिराळकर,संजयसिंह साळोखे, उदय लाड,किशोर घाटगे,विक्रमसिंह जरग,विकास सुर्वे, नितीन पन्हाळकर, गितांजली पाटील, डॉ. पद्मा पाटील, दादासो देसाई, संभाजी खेबुडकर,कपील कदम,यांचेसह कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.