जिल्हा परिषद मुख्यालय प्रांगणात महाराष्ट् दिन साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी ) 1 मे हा महाराष्ट् दिन जिल्हा परिषद मुख्यालयाच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस. यांचे हस्ते सकाळी 7 वाजता ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला .

यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत गायन कार्यक्रम झाला. त्यानंतर मतदाता शपथ घेणेत आली. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांनी आपण व आपल्या कुटुंबाने लोकशाही बळकट करणेसाठी मतदाता शपथ घ्यावी व येणा-या सर्व निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले.

याप्रसंगी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने , प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधव मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे , माधुरी परीट प्रकल्प संचालक (पाणी व स्वच्छता), कार्यकारी अभियंता (बांधकाम) सचिन सागांवकर, प्रभारी कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) वैजनाथ कराड,जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) शिल्पा पाटील , अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर , जिल्हा कृषि अधिकारी तानाजी पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, मुख्य लेखा व वित्त् अधिकारी अरुणा हसबे तसेच सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.