धैर्यशील माने यांना मोठया मताधिक्यानं विजयी करा : खासदार डॉ.अनिल बोंडे यांचे आवाहन

इचलकरंजी : महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात सर्वच समर्थक कार्यकर्त्यांनी थेट मतदाराशी संपर्क साधून मतदानासाठी आग्रह धरावा, आणि माने यांच्या विजयांसाठी रात्रीचा दिवस करून मताधिक्य देण्याचे आवाहन खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने माजी कृषीमंत्री, राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार वसंत खंडेलवाल यांनी येथील भाजपा प्रचार कार्यालयाला भेट दिली. स्वागत प्रदेश भाजपा उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले.पुढे त्यांनी कार्यकर्त्याशी थेट संवाद करत मतदार संघाची माहिती करून घेतली. प्रचारासाठी मोठ्या नेत्यांच्या सभेबरोबर कोपरा सभा महत्त्वपूर्ण ठरतील असे सांगितले.


संविधान वाचविणारे आपण आहोत असे सांगत ते म्हणाले, अखेरच्या टप्प्यात राजू शेट्टी हे मतदारांना भावना वश करण्याची शक्यता आहे. आपले उमेदवार धैर्यशील माने यांचे प्रतिस्पर्धी भूलथापा मारतील याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.


यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे,आणि इतरांनी प्रचार यंत्रणेची माहिती दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके, माजी नगरसेवक सुनील साळुंखे, मनोज हिंगमिरे, युवक आघाडीचे जयेश बुगड, ऍड अनिल डाळ्या, विनोद कांकानी, शिवसागर केसरवानी, राजेश रजपुते, प्रशांत शालगर, अश्विनी कुबडगे, दीपक कडोलकर,दीपक पाटील, राजू भाकरे म्हाळसाकांत कवडे, बाळकृष्ण तोतला, हेमंत वरुटे, संजय गेजगे, प्रवीण पाटील यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706