कॉमर्स कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांकडून स्मशानभूमीस-30 हजार शेणी दान

कोल्हापूर येथील कॉमर्स कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्पदन या ग्रुपने येथील महापालिकेच्या स्मशानभूमीस 30 हजार शेणी दान करून सामाजिक बांधीलकी जपली.

1988 सालच्या या माजी विद्यार्थी ग्रुपमध्ये 170 विद्यार्थी आहेत. या ग्रुपने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांना कॅप वाटप केल्या. आता स्मशानभूमीत शेणी तुटवडा असल्याने शणी दान उपक्रम राबवला. चार टेंपोतुन 30 हजार शेणी आणल्या. खर्चाला फाटा देउन हा उपक्रम राबवला. स्पदनचे संजय शिंदे, किरण गांधी, संजय नागेशकर, संजय गुंदेशा, महेंद्र मिसाळ, अजित कापसे, महिला प्रतिनिधी अर्चना स्वाती यांनी सहभाग घेतला