कोल्हापूर : हिंदू धर्म गुरु असलेल्या दशनाम गोसावी समाजाची दोन दिवसीय राज्य शिखर परिषद कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतीबा संपन्न झाली. या परिषदेला राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या निमंत्रित समाज बांधवांची प्रमुख उपस्थिती होती.
या परिषदेमध्ये समाजातील विविध प्रश्न नियोजित उपक्रम,समाजाचे सर्वेक्षण,शिखर परिषदेची रचना काही ठराव या परिषदेत एकमुखाने ठरविण्यात आले. या परिषदेला प्रा.रवींद्र भारती पुणे, सामाजिक कार्यकर्ते अनिल पुरी लातूर, सुखदेव गिरी, डॉ.कृष्णदेव गिरी कोल्हापूर, प्राचार्य विराट गिरी, मेघा भारती अमरावती, शुभांगी भारती, सूर्यकांत गोसावी हडपसर, स्वप्नील भारती परभणी, अँड.राजश्री गोसावी सांगली, धनराज गिरी धाराशिव, सुनील भारती जालना, पोलीस अधिकारी पंकज गिरी शिवाजी बुवा, नामदेव गिरी, उर्मिला भारती, अँड.नीलंबरी गिरी, शिवाजी बुवा आदि मान्यवरांनी परीषदेला विविध विषयवर सखोल मार्गदर्शन केले.
आगामी काळात दशनाम गोसावी समाज राज्य समन्वय समितीच्या वतीने भव्य शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेला कृष्णात गोसावी, अविनाश भारती, अनिल गिरी, सुनील गिरी, उर्मिला भारती, संयोगिता गोसावी, बाबासाहेब बुवा, संजय गिरी, शामराव पुरी, राजेंद्र गिरी, शुभदा गोसावी यांच्यासह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. ही परिषद पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी योगेश भारती, रोहित बुवा नेताजी बुवा शहाजी गिरी शरद बुवा अमर पुरी राजगुरू गोसावी यांनी परिश्रम घेतले.