मुंबई: 20 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. या निर्णयाला काही मनोज जरांगेंनी दिलेलं आरक्षण नाकारत पुढील आंदोलनाची घोषणा केली. असे असतानाच अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेत जरांगेंवर गंभीर आरोप केले. जरांगे पाटील यांनी अनेकांचे संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारीपासून दररोज राज्यभर रास्तारोको आंदोलनांची हाक दिली आहे. जरांगेच्या या घोषणेला काही वेळ जात नाही तोच मराठा आंदोलनात सहभागी झालेले अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेने उपोषणाचा बनाव केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यापर्यंत यावेत त्यांनी त्यांना पाणी पाजावे यासाठी जरांगे यांनी उपोषण सोडताना देखील अट्टहास केला. जरांगे यांचे उपोषण श्रेयवादासाठी आहे. गरीब लोक आरक्षण मागतात. पण, जरांगेंवर जेसीबीतून फुले उधळणारे लोक आले कोठून? यांना पैसे कोण देतं असे सवाल बारसकर यांनी उपस्थित केले. जरांगेंचे दादागिरी करणारे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. जरांगेनी चार शेतकऱ्यांची घरं उद्धवस्त केली. जरांगेंनी मराठ्यांची घरं उद्धवस्त केली. लक्ष कसं वेधून घेता येईल हे जरांगेला चांगलं माहित आहे. टीआरपी मिळवण्यासाठी मुद्दाम तो पत्रकारांसमोर लोकांची मीडियाची फसवणूक होईल अशा भाषेत बोलतो. जरांगेची भाषा शिवराळ आहे असे अवनेक गंभीर आरोप बावसरक यांनी केले आहेत.