कोल्हापूर : राज्य सरकारने काल बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर केला आहे. पण हे मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल की, नाही याबाबत मला शंका आहे असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
कोल्हापूर येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आले आहे, पण राजकीय आरक्षण देण्यात आले नाही.याआधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशाच पद्धतीने मराठा आरक्षण दिलं होतं, पण ते कोर्टात पुढे टिकलं नाही. पुन्हा तशाच्या पद्धतीने हे आरक्षण मंजूर करून घेतलं आहे. कायदेतज्ज्ञ बापट यांच्या मते हे आरक्षण कोर्टात टिकणार नसल्याचं पवार यांनी सांगितलंय.मनोज जरांगे पाटील सगेसोयरे कायद्यावर ठाम असून आज ते अंतरवली येथे बैठक घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.