मला एका जातीचा किंवा धर्माचा विचार करता येत नाही : एकनाथ शिंदे

मुंबई : मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव विधानसभेत सादर करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाने आरक्षणासाठी गेले पाच महिने लढा उभारला.

आरक्षणासाठी मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत.मी वेळोवेळी मुख्यमंत्री म्हणून मराठा आंदोलकांना भेटलो. “मला एका जातीचा किंवा धर्माचा विचार करता येत नाही. मराठा असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्याबद्दल तीच भावना व्यक्त केली असती. समस्त राज्याला आणि ओबीसींना सांगतो की त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण द्यायचा निर्णय घेतलाय.

🤙 9921334545