आकोला : या बाबाचं खाणंही वेगळं आहे. तो खात नाही हे सर्टिफिकेट मी तुम्हाला देतो. पण तो दुसऱ्यांना खाऊ घालतो हे लक्षात घ्या. तो स्वतः खात नाही, तो दुसऱ्यांना खाऊ घालतो.आणि दुसऱ्यांना खाऊ घातलं की त्यांना म्हणतो की अर्ध मला, असा भ्रष्टाचाराचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. ते अकोल्यात जाहीर सभेत बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदी घोषणा करतात की ना खाऊंगा, ना खाने दुंगा. आपल्याला काय वाटतं, याने बायको सोडून दिली आहे.
मुलंही नाहीत. मग कोणासाठी कमावणार? आपल्यालाही खरं वाटतं. की एकटाच आहे, तर कमवणार कोणासाठी? आगे पिछे कोणीच नाही. आणि म्हणून आपल्याला विश्वास वाटतो का बाबा खरं बोलतो, अशी बोचरी टीका आंबेडकर यांनी केली.मोदींना हरवायचं असेल तर जागा वाटपात न अडकता सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे, असे आवाहन देखील आंबेडकर यांनी विरोधी पक्षांना केले.