कोल्हापूर : उद्धव सेनेची मालमत्ता नको, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना हवी आहे. असे वक्तव्य कोल्हापूर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जेव्हा पक्षाचे आमदार माझ्यासोबत आले तेव्हा माझ्यावर आणि आमच्या आमदारांवर 50 कोटी रुपये घेतल्याचे खोटे आरोप करण्यात आले. पण, मला सांगावेसे वाटते की, केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह दिले तेव्हा उद्धव यांच्या नेत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आता पक्षाची संपत्तीही शिंदे यांच्याकडे जाईल, असे त्यांच्या लोकांना वाटत होते. पण त्याचवेळी मी स्पष्ट केले होते की आम्हाला त्यांची मालमत्ता नको आहे, आम्हाला फक्त बाळासाहेबांच्या विचारांवर राजकारण करणारी शिवसेना हवी आहे. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे.