मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यावर कायदा करत त्याला मान्यता न दिल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या या उपोषणाला यश मिळाले असून राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला असून तो स्वीकारुन तुम्ही त्याचे कायद्यात रुपांतर करा. यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. सरकारने दोन दिवसात तातडीने अधिवेशन बोलवावं.