ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली नव्या पक्षाची घोषणा

मुंबई: राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाने ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली. या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. याचदरम्यान, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी बुधवारी ओबीसी समाज आधारित नव्या पक्षाची घोषणा केली. शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत पक्षाचं नाव आणि ध्येय धोरणांची घोषणा केली. ‘ओबीसी बहुजन पक्ष’ असं या पक्षाचं नाव आहे.

प्रकाश शेंडगे पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘मराठा आरक्षणाचा वादळ महाराष्ट्रावर घोंघावत आहे. त्यांना आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजावर घाला घालण्याचं पाप करण्यात आलं. सत्तेचा वापर ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी घाला घालण्यासाठी करण्यात आला. सत्ता हस्तगत करण्यासाठी राज्यातील ओबीसी भटके समाजाने ठरवलं. त्यानंतर आता पक्ष स्थापन करण्यात आला आहे.