जीव गेला तर दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात; जारांगे

जालना: मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषनासाठी बसले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकार फक्त मजा बघत असल्याची टीका केली आहे. माझा जीव गेला तर दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात होईल असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलावण्यात येणार होते. पण १५ तारखेचं अधिवेशन २० तारखेला घेण्यात येणार आहे. असे सांगत सरकार दुर्लक्ष करत आहे का असा सवाल उपस्थित केला. मराठ्यासांठी जीव गेला तरी चालेल पण मी माझ्या भुमिकेवर ठाम असल्याचे जरांगे पाटील सांगितले. माझा जीव गेला तर दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात होईल असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.