14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक

जालना : आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत, त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शांततेमध्ये बंद पाळा, असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे.

सकल मराठा समाजाकडून येत्या 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईतल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनात राज्य सरकरानं मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असून त्याचं परिपत्रकही राज्य सरकारनं काढलं. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत, त्यामुळे या कायद्याची तात्काळ अंमलबजाणी व्हावी यासाठी येत्या 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. ते मेसेजेसही सोशल मीडियावर सकल मराठा समाजाने व्हायरल केले आहेत.

🤙 9921334545