किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशीच पहिल्या पायरी पर्यंतचं सूर्यकिरणे…

कोल्हापूर : किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिरातील पहिल्या पायरीपर्यंतचं सूर्यकिरणे पोहोचली.सूर्याच्या उत्तरायण कालखंडातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. मात्र, धूलिकण, ढगाळ वातावरण व हवा प्रदूषणामुळे आवरण तयार होत सूर्यकिरणे विखुरली गेली.

दरवर्षी २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान उत्तरायण कालखंडातील किरणोत्सवाला सुरुवात होते. गतवर्षीही पहिल्या दिवशी किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला नव्हता. महाद्वार रोड कमानीपासून सायंकाळी ५:३० ला या किरणोत्सवाची सुरुवात झाली. ६.१५ ला ती मंदिरातील गर्भकुटीच्या संगमरवरी पहिल्या पायरीपर्यंत येऊन लुप्त झाली.

किरणोत्सवाचा प्रवास

महाद्वार रोड कमान : सायंकाळी ५.३०

गरुड मंडपच्या पाठीमागे : ५:३४

गरुड मंडपच्या मध्यभागी : ५:४०

गणपती मंदिराच्या पाठीमागे : ५:५४

कासव चौक : ६:०१ वा.

चांदीच्या उंबरठ्याच्या आत : ६.१४

अंबाबाई मंदिरातील गर्भकुटीच्या

संगमरवरी पहिल्या पायरीपर्यंत : ६.१५