पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा…

नवी दिल्ली: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सायफर प्रकरणात त्यांना ही शिक्षा झाली आहे. त्यांच्यासोबत पीटीआयचे उपाध्यक्ष शाह महुम्मद कुरेशी यांना देखील १० वर्षांची शिक्षा झाली आहे.या शिक्षेमुळे इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याच शक्यता आहे.

विशेष कोर्टाने ऑफिशियल सिक्रेट अॅक्टच्या अंतर्गत ही शिक्षा सुनावली असल्याचं पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने सांगितलं आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याआधी इम्रान खान यांना झालेल्या या शिक्षेमुळे त्यांच्या पीटीआय पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते

.