कोल्हापूर (प्रतिनिधी) क्रिडाई कोल्हापूर तर्फे आयोजित ‘दालन २०२४’ या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचा मंडप उभारणी कार्याचा शुभारंभ आर्या स्टील्स् रोलिंग इंडिया प्रा. लि., एम.आय.डी.सी., कागल चे संचालक अलोक बन्सल यांच्या हस्ते क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांच्या अध्यक्षतेखाली व दालनचे चेअरमन चेतन वसा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रोजी संपन्न झाला. ग्राउंड कमिटी चेअरमन पवन जामदार यांच्या हस्ते मंडप उभारणी कार्याचे ‘भुमिपूजन करण्यात आले.
किडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना संघटनेच्या ३५ वर्षा च्या कारकिर्दीचा आढावा घेत किडाईने बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्याबरोबर शहराच्या विकासात केलेल्या भरीव कार्यावर प्रकाश टाकला दालन बदल माहीती देताना या दालनचे वैशिष्ट म्हणजे सन १९९२ साली बांधकाम विषयक प्रदर्शनाची सुरवात झाली. यंदाचे दालन २०२४ हे क्रिडाई कोल्हापूर तर्फे भरवले जाणारे १२ वे दालन आहे. या दालनचे उद्घाटन शुक्रवार ९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४.०० होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दालन २०२४ विषयी माहिती देताना दालनचे चेअरमन चेतन वसा यांनी सांगितले की, प्रदर्शनाचा मुख्य हेतू कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली नवनविन बांधकाम प्रकल्प व तंत्रज्ञान, बांधकाम विषयक साहित्य, सेवा, अर्थ सहाय्य योजना यांची माहिती मिळणार असून घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यास या प्रदर्शनाचा मोठा हातभार लावणारा आहे. दालन २०२४ हे CRAFTING HOME SHEPIN TOMORROW हया संकल्पनेवर आधारित असून याचे लक्ष हे यंदा संधी सर्वासाठी असे आहे. येणा-या दालनमध्ये १६० स्टॉल असून सर्व स्टॉलचे बुकिंग झाले आहे. क्रिडाईचे जवळपास १०० सभासद आपले शंभराहुन अधिक प्रकल्प दालन मध्ये प्रदर्शित करणार आहेत.
या दालनमध्ये प्रायोजक पुढील प्रमाणे आहेत.प्लॅटिनियम स्पॉन्सर- आर्यास्टील्स् रोलिंग इंडिया प्रा. लि.डायमंड स्पॉन्सर- मिराशाशेपर्सप्रा.लि(अनवितडोअर्स)गोल्डन स्पॉन्सर – एशियन गनिटो इंडिया लि. (AGL),स्टेट बँक ऑफ इंडिया,यश पॉली सिल्वर स्पॉन्सर को-स्पॉन्सर- सुरज इस्टेट डेव्हलपर्स,श्री. बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स, देशपांडे इन्फा,बटू बिल्डर्स,बेडेकर लाईफ एल.एल.पी.,के.ई. आय. इंडस्ट्रिज लि.
डेको स्टुडिओ, फेराकॉल, रामसिन्हा कन्स्ट्रक्सन प्रा. लि., सुबल रिअलटीबेल सॅनिटरी वेअर, एल. आय. सी हौसिंग फायनान्स लि., अॅस्ट्रल लि.स्काय लाइन रूफ अॅन्ड कंपनी.
परिसरातील सिव्हील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्यासाठी शनिवार १० फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता टेक्निकल सेमिनार आयोजित केले असून, रविवार ११ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता प्रसिध्द मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सुसंवाद साधणार आहेत. सांगता समारंभ सोमवार १२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता वाजता होणार आहे.
या कार्यक्रमास क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, सचिव संदिप मिरजकर, खजानिस अजय डोईजड, दालन चेअरमन चेतन वसा, व्हाईस चेअरमन प्रमोद साळुंखे, समनव्यक अतुल पोवार, सह समन्व्यक संग्राम दळवी, सह समन्व्यक लक्ष्मीकांत चौगुले, सचिव गणेश सावंत, सहसचिव संदिप पोवार, बिझनेस कमिटी चेअरमन निखिल शहा, पल्विक रिलेशन कमिटी विश्वजित जाधव, रजिस्ट्रेशन कमिटी चेअरमन प्रदिप भारमल, होडींग कमिटी चेअरमन श्रीराम पाटील, स्टॉल अलोकेशन चेअरमन सत्यजित मोहिते, तसेच क्रिडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजीव परीख, जेष्ठ सभासद श्रीनिवास गायकवाड, कृष्णा पाटील, सुजय होसमणी, शंकर गावडे, प्रकाश देवलापूरकर, विलास रेडेकर, हेमंत सोनार, किडाई कोल्हापूरचे सहसचिव सोमराज देशमुख, सहखजानिस सचिन परांजपे, संचालक आदित्य बेडेकर, दिपक वाघूले, नंदकिशोर पाटील, अमोल देशपांडे, सभासद, पायोजक, स्टॉलधारक मोठया संख्येने हजर होते.
आभार प्रदर्शन किडाईचे सचिव संदिप मिरजकर मानले.