कुंभी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कै.शामराव बाबुराव गोदडे यांचे निधन

बहिरेश्वर( प्रतिनिधी ) : मौजे बहिरेश्वर ता करवीर येथील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ लेखक,कुंभी कासारी कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन,माजी सरपंच कै शामराव बाबूराव गोदडे वय वर्षे 75 यांचे शूक्रवार दि 26.1.24रोजी आज पहाटे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुले,मुली सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांनी आपल्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीत आपल्या बेरकी संभाषण आणि लेखणीतून अनेकांची मने जिंकली होतीत,त्यांनीहॅलो मी चेअरमन बोलतोय सरपंच खुनी पाटील बेइमानी,गाव साधं, पुढारी सोद** अशी नाटके तसेच चित्रपटासाठी लावण्या लिहल्या त्या लोकप्रिय ही ठरल्याहजरजबाबी,बेरकी भाषण शैलीमुळे पंचक्रोशीत त्यांची मूलूख मैदान तोफ,गोदडे मामा , नाना अशी खास ओळख निर्माण झाली होती.

पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.त्यांच्या या अकाली जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.तर राजकीय व सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

आमदार चंद्रदीप नरके, राजेंद्र सूर्यवंशी, बाळासाहेब खाडे, हिंदुराव चौगले आदींनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.रक्षाविसर्जन रविवार दिनांक 28.1.24रोजी बहिरेश्वर मुक्कामी येथे आहे.