कोल्हापूर : येथील रंकाववेश तालमीच्या वतीने आज आयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन केले होते.
येथील साई मंदिर फुलानी सजवले होते. तर तालीम मंडळाच्या वतीने अध्यक्ष दिलीप माने.,उपाध्यक्ष राजू शिंदे तसेच संजय शिंदे, खजानिस विजय गायकवाड शक्ती शिंदे, संग्राम शिंदे, गुरु लाड यांच्या हस्ते महाप्रसाद म्हणून 2500 हून अधिक लाडू वाटप करण्यात आले.अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला .