नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला रामलल्लाची पूजा करण्याचा मान…


नवी मुंबई : २२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रामलल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत.२२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मिळाला आहे.

नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्य पंतप्रधान मोदींसोबत पूजा करणार आहेत. अयोध्या नगरीतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा मान देशातील ११ दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यात नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याचा सामावेश आहे.अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या सोहळ्यासाठी मंदिराच्या न्यास समितीने जोरदार तयारी केली आहे. या सोहळ्यासाठी देशासहित जगभरातून मंडळी हजेरी लावणार आहेत. या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा मान देशातील ११ दाम्पत्यांना मिळाला आहे.

त्यात नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याचा सामावेश आहे.२२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रामलल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत. देशभरातील ११ जोडप्यांना ही संधी मिळाली असून यात कांबळे दाम्पत्य देखील आहे.

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या दाम्पत्यांना १५ जानेवारीपासून नियमांचं पालन करावं लागणार आहे. या दाम्पत्यांना १५ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत कडक ४५ नियमांचं पालन करावं लागणार आहे. यात वस्त्र परिधान ते जेवणापर्यंतच्या नियमांचा सामावेश आहे. विठ्ठल कांबळे हे चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असून, आई-वडिलांमुळे घरात वारकरी संप्रदाय असल्याने अयोध्येच्या निमंत्रणाने कांबळेंच्या परिवाला आनंदाचे अश्रू अनावर झाले.

३ जानेवारीला अयोध्येवरून राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास निमंत्रणाचा फोन आला. तुमची निवड झाल्याचे सांगण्यात आले. माझा विश्वास देखील बसला नाही. मला एवढा आनंद झाला की तो शब्दात सांगता येत नाही, ३२ वर्षापूर्वीची सेवा आज फलद्रूपी पूर्ण झाली. वारकरी आई वडिलांचे सार्थक झाले, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेले कांबळे १९९२च्या कार सेवेत सहभागी होते.

बाबरीचा ढाचा पडताना त्यांनी पाहिला. मधल्या ३२ वर्षांत ते कधीही पुन्हा अयोध्येला गेले नाहीत. कांबळे म्हणाले, रामलल्लाला तंबूत राहिलेले देखील मी पाहिले. आता तिथे भव्य मंदिर बघायला मिळेल. प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आमच्या उपस्थितीत होत आहे. हे आमचे परम भाग्य आहे. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा क्षण आमच्या आयुष्यात येईल याची आम्ही कल्पना देखील केली नव्हती. आम्हाला या सोहळ्यात सहभागी होता येत असल्यामुळे अत्यानंद झाला आहे. त्याचबरोबर अयोध्येच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार म्हणून, धोतर – आणि पैठणी अशी वेशभूषा असणार असल्याचे कांबळे दाम्पत्याने सांगितले.