जिल्हास्तरीय बाल महोत्सवामध्ये बालकल्याण संकुलाचे विशेष प्राविण्य

कोल्हापूर( प्रतिनिधी) शासनाच्या महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या निरीक्षण गृह व बालगृहातील प्रवेशित मुला मुलींच्या विकासाचे दृष्टीने त्यांच्या अंगी असणाऱ्या कला क्रीडा व सांस्कृतिक गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हास्तरावर चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन 9 जानेवारी 2024 ते 11 जानेवारी 2024 अखेर दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने महाविद्यालय अलका शेती फार्म सांगाव रोड कागल येथे करण्यात आले होते.

या बाल महोत्सवामध्ये घेण्यात आलेल्या कबड्डी खो-खो 100 मीटर, 200 मीटर धावणे 100 x 4 रीले, लांब उडी, लंगडी, डॉ बॉल, चित्रकला,निबंध, वकृत्व हस्ताक्षर, गायन तसेच सांस्कृतिक स्पर्धांमध्ये संकुलातील मुलांचे निरीक्षणगृह/बालगृह, अनिकेत निकेतन बालगृह, सौ. नलिनी शां. पंत वालावलकर कन्या निरीक्षणगृह/ बालगृह व कन्या बालगृह येथील मुला मुलींनी उत्साही सहभाग घेऊन अनेक बक्षीसे पटकावली.

त्यामध्ये डॉ. सर्वपल्ली रा. निरीक्षणगृह /बालगृह येथील मुलांनी जनरल चॅम्पियनशिप तसेच सौ. नलिनी शां. पंत वालावलकर कन्या निरीक्षणगृह बालगृह येथील मुलींनी जनरल चॅम्पियनशिप मिळवली याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष व्ही.बी पाटील मानद कार्यवाह पद्मजा तिवले तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने सर्व मुलामुलींचे विशेष कौतुक करण्यात आले.

या बाल महोत्सवाकरिता संस्थेचे सर्व पदाधिकारी विश्वस्त व अधीक्षक एस एस गोजारी सौ. धनश्री थोरात, पी.के.डवरी सौ. द्रौपदी पाटील, सचिन माने, तुकाराम कदम, सौ धनश्री जाधव सौ पूजा नलवडे, सौ.शरयू मोरे, राजश्री नाथबुवा, मोहिनी तोरस्कर तसेच कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.