पतपेढीच्या निर्णयात बेकायदेशीर सुकाणू समितीचा हस्तक्षेप कशासाठी? दादा लाड यांचा सवाल


कोल्हापूर: कोजिमाशि पतपेढी ही शिक्षकांची संस्था आहे. संचालक व सभासद सुशिक्षित व जाणकार आहेत अशा परिस्थितीत पतपेढीतील बेकायदेशीर सुकाणू समिती संस्थेच्या निर्णयात हस्तक्षेप कशासाठी करते ?असा सवाल स्वाभिमानी सहकार आघाडी प्रमुख दादा लाड यांनी केला.
कणेरी (ता.करवीर )येथील श्री. काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे प्रचार दौऱ्यात ते बोलत होते.

लाड पुढे म्हणाले ,एका थकीत कर्जदार सभासदांसाठी त्याच शाळेतील सर्व शिक्षकांचा पगार जप्त करण्याची चुकीची कारवाई पतपेढीने केली आहे.हा सभासदांचा अपमान असून त्यांच्यावर अन्याय केला आहे. याचे उत्तर हे सभासद सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत नक्कीच देतील.
वसुली अधिकाऱ्यांच्या नावावर वसुली ऍडव्हान्स टाकून ती रक्कम उचलणारे माजी अध्यक्ष कोण याचेही उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे.

एका मोठ्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना सभासदत्व देऊन सांगरूळ फाटा- कोपर्डे येथे पतपेढीची शाखा उघडण्याची गरज नव्हती.प्रत्येक दिवाळी भेटीवेळी सभासदांना कॅन देणे ऐवजी तेल पाऊचमध्ये दिले जाते. सभासदांची ही गैरसोय होत आहे.

भरमसाठ कर्मचारी भरती करून संस्थेवर आर्थिक बोजा टाकला आहे.कोजिमाशि पतपेढीला वैभव प्राप्त करून देण्यासाठीसभासदांनी स्वाभिमानी सहकार आघाडीला मताधिक्याने विजयी करावे.उमेदवार कैलास सुतार म्हणाले, दादा लाड यांचे नेतृत्वाखाली कोजिमाशि पतसंस्थेने सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. सभासदांना मोठा लाभांश दिला जातो.त्यांच्याच नेतृत्वाखाली पतपेढीमध्येही आदर्शवत कारभार होईल.सभासद हिताचे निर्णय घेतले जातील. त्यामुळे स्वाभिमानी सरकार आघाडीला सर्वांनी साथ द्यावी.

यावेळी कोजिमाशि पतसंस्थेचे माजी संचालक समीर घोरपडे, अनिल चव्हाण, अशोक मानकर, राजेंद्र पाटील ,बसाप्पा मडिवाळ, राजेश पाटील आदी उपस्थित होते.