नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रेचा’ मार्ग काँग्रेसकडून जाहीर करण्यात आला आहे. ६७ दिवसांत एकूण ६७०० किमीहून अधिक अंतराची ही यात्रा असणार आहे.देशातील १४ राज्यांमधून ती मार्गक्रमण करणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली.
मणिपुर ते मुंबई (14 जानेवारी ते 20 मार्च) अशी ही भारत जोडो न्याय यात्रा चालणार आहे. ही यात्रा यापूर्वीच्या भारत जोडो यात्रेपेक्षा थोडी वेगळी असणार आहे. यामध्ये पायी यात्रेचा मार्ग कमी असणार आहे, तर बसमार्गानं जास्तीत जास्त लोकांना भेटण्याची योजना आखण्यात आली आहे.
असा असेल भारत जोडो न्याय यात्रेचा रोड मॅप
• मणिपूर | 107 किमी | 4 जिल्हे
• नागालँड | 257 किमी | 5 जिल्हे
• आसाम | 833 किमी | 17 जिल्हे
• अरुणाचल प्रदेश | 55 किमी | 1 जिल्हा
• मेघालय | 5 किमी | 1 जिल्हा
• पश्चिम बंगाल | 523 किमी | 7 जिल्हे
• बिहार | 425 किमी | 7 जिल्हे
• झारखंड | 804 किमी | 13 जिल्हे
• ओडिशा | 341 किमी | 4 जिल्हे
• छत्तीसगड | 536 किमी | 7 जिल्हे
• उत्तर प्रदेश | 1,074 किमी | 20 जिल्हे
• मध्य प्रदेश | 698 किमी | 9 जिल्हे
• राजस्थान | 128 किमी | 2 जिल्हे
• गुजरात | 445 किमी | 7 जिल्हे
• महाराष्ट्र | 480 किमी | 6 जिल्हे
यात्रेची लांबी : 6,700 किमीहून अधिक
67 दिवस | 110 जिल्हे | 100 लोकसभा | 337 विधानसभा