प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ….

मुंबई: प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील कायमच सर्वत्र चर्चेचा विषय असते. आपल्या लावणीच्या तालावर गौतमी नेहमीच अख्ख्या महाराष्ट्राला ठेका धारायला लावते.कायमच डान्समुळे प्रसिद्ध होणाऱ्या गौतमीचा १५ डिसेंबरला चित्रपट रिलीज झाला. तिच्या लावणीच्या कार्यक्रमाला जितकी गर्दी होते, त्याहून जास्त गर्दी तिच्या चित्रपटाला होणार अशी चर्चा झाली होती. पण असं काहीच घडलं नसल्याचं दिसत आहे. तिच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळतच आहे. 

१५ डिसेंबरला गौतमीचा ‘घुंगरु’ चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत गौतमीसह बाबा गायकवाड, सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. 

बाबा गायकवाडी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यांनी चित्रपटाची कथा लेखन, अभिनय आणि निर्मितीची धुराही त्यांनी सांभाळली. चित्रपटाला प्रेक्षकांकडून म्हणून तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आपल्या डान्समधील अदांमुळे गौतमी चांगलीच चर्चेत असते. गौतमी पाटीलचा अवघ्या महाराष्ट्रात चाहतावर्ग आहे. तिला पाहण्यासाठी तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण एकच गर्दी करतात. 

गौतमीच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठ फिरवलीय. अवघ्या सात दिवसातच गौतमीच्या ‘घुंगरु’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरुन आपला गाशा गुंडाळाला. चित्रपटाच्या अनेक शोला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली नाही. चित्रपटाचे फारसे प्रमोशनही होताना पाहायला मिळाले नाही. 

चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत नसल्यामुळे काही दिवसातच चित्रपटाचे बॅनर देखील उतरवण्यात आले. कायमच गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमामध्ये तोबा गर्दी करणारे चाहते तिच्या चित्रपटालाही उत्तम प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा होती. 

पण वास्तवात चित्रपट पाहायला येणाऱ्यांची संख्या फार कमी होती. त्यामुळे अवघ्या ७ दिवसातच चित्रपट काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.