तालीम संघाच्या वतीने कुस्तीगिरांना कुस्ती खेळाचे किट वाटप

कोल्हापुर (प्रतिनिधी) भारतीय खेळ प्राधिकरण संस्था(साई), कांदीवली मुंबई या संस्थेने दत्तक घेतलेल्या कोल्हापुर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ मोतीबाग तालीम व शासकीय कुस्ती केंद्रातील निवड झालेल्या ६० विद्यार्थी कुस्ती मल्लांना कुस्ती खेळाचे उपलब्ध झालेले नवे किट तालीम संघाचे अध्यक्ष व्ही.बी.पाटील यांच्या हस्ते व उपाध्यक्ष सी.बी.चव्हाण तसेच साई संस्थेचे कोच पै.भोलानाथ पाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोतीबाग तालमीत वाटप करण्यात आले.

भारतीय खेळ प्राधिकरण (साई)कांदीवली मुंबई ही भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाची एक महत्वपूर्ण भाग असुन ती विविध खेळासाठी देशातील युवा खेळाडुंना नेहमीच प्रोत्साहित करत असते. त्यांनी दिलेल्या किटमध्ये १ ट्रॅकसूट १ किट बॅग व १ वार्माप शूज असे साधारण ४००० रूपये किंमतीचे साहित्य आहे.यावेळी मोठ्या संख्येने कुस्तीगीर उपस्थित होते.