शाश्वत विकास व पारदर्शक कारभारासाठी आमदारकीची संधी द्या: राजे समरजितसिंह घाटगे

सेनापती कापशी (प्रतिनिधी) कागल तालुक्यात गेली पंचवीस वर्षे विकासकामांचा केवळ आभास निर्माण केला. शासनाकडून आलेल्या निधीचा पारदर्शकपणे वापर केला नाही. त्यामुळे यापुढे शाश्वत विकास व पारदर्शक कारभारासाठी येत्या २०२४ च्या निवडणूकीत आमदारकीची संधी द्या.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

करड्याळ ता. कागल येथे त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ४१लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनवेळी ते बोलत होते.

जन सुविधा, क वर्ग यात्रा स्थळ ,प्राथमिक शाळा दुरुस्ती, अंगणवाडी इमारत बांधकाम आदी रू 22 लाखाची कामे पूर्ण झाली असून त्याचे उद्घाटन व दलित वस्ती सुधारणा पारेशन संलग्न सौर ऊर्जा प्रकल्प,अंतर्गत रस्ते, डांबरीकरण सोलर हायमास्ट, व ओपन जिम अशा 19 लाखाच्या कामाचा शुभारंभ श्री.घाटगे यांच्या हस्ते
करणेत आला.
श्री घाटगे पुढे म्हणाले, कोणतीही सत्ता किंवा पदावर नसताना गेल्या वर्षभरात 75 कोटी रुपयांचा निधी कागल विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी खेचून आणला आहे.विरोधक विकासकामांचा डोंगर उभा केल्याच्या वल्गना करत आहेत. मात्र हा निधी लोकांना अपेक्षित असलेल्या कामांवर खर्च न करता ठेकेदारांच्या सोयीने तो वापरला आहे.त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधीचा गैर वापर झालेला आहे.

नव्याने उभारण्यात येणाऱ्या ओपन जिम साठी गावचे प्रतिष्ठित नागरिक, रिटायर्ड न्यायाधीश आनंदराव पाटील यांनी व्यायाम साहित्य दिल्याबद्दल त्यांच्याप्रती ही गावामार्फत कर्तज्ञता व्यक्त केली.

यावेळी ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सरपंच प्रियांका पाटील,उपसरपंच कृष्णात कुंभार,शाहूचे संचालक सचिन मगदूम, संजय बरकाळे,रामदास कुंभार ,बळीराम कुंभार,शिवाजी गेंगे,संजय गेंगे,शितल ठक,सविता कांबळे आदी उपस्थित होते.स्वागत प्रकाश गेंगे-पाटील यांनी केले. आभार विजय बिरंजे यांनी मानले.

शाहू खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक प्रकाश पाटील म्हणाले, करड्याळ सारख्या छोट्या गावाकडे विद्यमान लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मात्र समरजितसिंह घाटगे यांनी या गावची मतदान किती आहे याचा विचार न करता करड्याळ सारख्या छोट्या गावाला आत्ता 41 लाख व याआधीचा 25 लाख असा पाऊण कोटी रुपयांचा मोठा निधी दिला आहे. इतिहासात करड्याळ गावासाठी एवढा मोठा निधी त्यांनी दिला याची उतराई नक्कीच 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये केली जाईल.