कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी (17 डिसेंबर) त्यांनी सांगलीत सभा घेतली. यानंतर रात्री उशिरा ते कोल्हापुरात दाखल झाले होते.
दरम्यान, आज (18 डिसेंबर) सकाळी सात वाजेच्या सुमारास पारंपरिक वेशात त्यांचं कोल्हापुरातील करवीर निवासीनी अंबाबाई मंदिरात आगमन झालं. मंदिरात जाऊन त्यांनी अंबाबाईची पूजा-अर्चा करुन दर्शन घेतलं. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव प्रशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी भागवत यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. अंबाबाईच्या दर्शनानंतर मोहन भागवत रत्नागिरीच्या दिशेनं रवाना झाले.