कोल्हापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फायनान्स कार्पोरेशनवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने या निवडणुकीत नागपूर विभाग वगळता अन्य विभागातील सर्व जागा बिनविरोध झाल्या. पुणे विभागातून व्ही. बी. पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीमध्ये गेल्या ६० वर्षांत ही निवडणूक बिनविरोध होण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामध्ये एकूण २५ जागापैकी नागपूर विभाग वगळता २३ जागांवर ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार प्रवीण दरेकर, अंकुश काकडे, आमदार अशोक चव्हाण अशा सर्वपक्षीय नेते मंडळींचे सहकार्य लाभले. व्ही. बी. पाटील यांनी यापूर्वी पाच वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
बिनविरोध निकाल असा सर्वसाधारण गट: मुंबई विभाग – प्रकाश दरेकर, सीताराम राणे,अॅड. दत्तात्रय वडेर. नाशिक विभाग – प्रथमेश गीते, अॅड. वसंतराव तोरवणे, डॉ. सतीशराव पाटील, विजय मराठे.पुणे विभाग: व्ही. बी. पाटील, सागर काकडे,शिवाजीराव शिंदे,वृषाली चव्हाण.औरंगाबाद विभाग : सुनील जाधव, दिलीप चव्हाण, हरिहरराव भोसीकर, जयसिंगपंडित, रवींद्र देशमुख. अमरावती विभाग :दीपक कोरपे, नितीन भेटाळू महिला राखीव प्रतिनिधी:जयश्री पाटील, शैलजा लोटके इतर मागासवर्गीय प्रतिनिधी वसंतराव घुईखेडकर अनुसूचित जाती गटःसिद्धार्थ कांबळे भटक्या विमुक्त गट :बाळासाहेब सानप समावेश आहे.
नागपूर विभागातून दोन जागांसाठी चारजण रिंगणात उतरल्याने ही निवडणूक लागली. रिंगणात उतरलेल्या उमेदवारांत त्र्यंबक शंकरराव खरबीकर, विनोद बाबाराव ढोणे, राकेश मुकुंदरावजी पन्नासे, डॉ. महेश देवराव भांडेकर या निवडणुकीसाठी २४ डिसेंबर रोजी मतदाने होणार आहे.