बहिरेश्वर येथे सापडलेली रक्कम प्रामाणिकपणे परत

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर ता करवीर येथील पांडुरंग रामू गोसावी यांनी म्हैस खरेदी करणेसाठी गावातील केडीसीसी शाखेतून 30000 रक्कम काढली व आपल्या बंडीच्या खिशात रक्कम ठेवून घरी निघून आले वाटेतच त्यांच्या खिशातून ती रक्कम गहाळ झाली. घरी जाऊन पैशाची मोजदाद केली असता 10000 रूपयाची रक्कम कमी असलेच त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ बँकेत संपर्क साधून याची माहिती दिली. संबंधित कॅशियर यांनी तात्काळ व्यवहार थांबवून झालेल्या व्यवहाराची खातरजमा केली …

त्यावेळी संबंधित शेतकऱ्याला संपूर्ण रक्कम दिल्याचे स्पष्ट झाले.त्यावेळेत बँकेत आलेल्या सर्वांची माहिती घेतली तरीही रक्कम सापडली नाही… व्हाट्सअप, फेसबुक आदी माध्यमातून संपूर्ण गावात व पंचक्रोशित दवंडी देण्यात आली….मात्र सायंकाळी बंडू आनंदा काशिद वय वर्षे 35 या यूवकाने त्यांच्या घरी जाऊन ही रक्कम परत केली व गोसावी कुटूंबावर आलेली वाईट वेळ टळून गेली. त्यांनी ही रक्कम मराठी शाळेजवळ सापडलेच सांगितले..

यावर गोसावी परिवाराचा आनंद गगनात मावनेसा झाला त्यांनी त्याचा मानपान करणेसाठी आग्रह केला पण त्याने तो नाकारत मनाचा मोठेपणा दाखवला…माणूसकी संपली…असे वातावरण होत असताना अजून तरी माणूसकी जिवंत आहे. असा आदर्श बंडू ने घालून दिला…यानंतर संपूर्ण गावातून त्यांच्यावर शूभेच्छांचा वर्षाव केला जात आहे….