रामाच्या भूमीवर जन्म घेतल्याचा अभिमान : जावेद अख्तर

मुंबई : जावेद अख्तर यांनी एका कार्यक्रमात हिंदू, राम-सीता आणि रामायण यांची प्रशंसा केली. रामाच्या भूमीवर जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे, असे जावेद अख्तर म्हणाले. ते नेहमी हिंदूंकडून शिकत आले आहेत, असेही ते म्हणाले.इतकंच नाही तर जावेद अख्तर यांनी जय सियारामच्या जयघोष करत आजपासून लोकांना तेच म्हणावं असं आवाहन केलं. आपल्या भाषणात त्यांनी रावणाचा उल्लेख केला आणि आपण कोणाला रावण मानतो हे देखील सांगितले.

कार्यक्रमात जावेद अख्तर म्हणाले की, मी नास्तिक आहे पण राम आणि सीता यांना देशाची संपत्ती मानतो. यामुळेच ते या कार्यक्रमाला उपस्थित आहे. जावेद म्हणाले की, ‘रामायण हा आपला सांस्कृतिक वारसा आहे आणि एक मनोरंजक विषय आहे. राम आणि सीतेच्या भूमीवर जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे. जेव्हाही आपण मर्यादा पुरुषोत्तमबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात फक्त राम आणि सीता येतात.’

दरम्यान, बॉलिवूडचे दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी नुकतीच राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रभू श्रीराम आणि सीता माता हे फक्त हिंदूंचे दैवत नाही असं विधान केलं. ते म्हणाले,’ प्रभू श्रीराम आणि सीता केवळ हिंदू देव देवता नाही. ही भारतीय संस्कृती आहे. मी नास्तिक आहे पण तरी मी प्रभू श्रीराम आणि सीतेला आपल्या देशाची संपत्ती मानतो म्हणूनच आज मी इथे आहे. जेव्हा आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो तेव्हा राम आणि सीताच आठवतात.जय सियाराम.’ सध्या या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.