कलादिग्दर्शक सुंदर कांबळे यांचे निधन

कोल्हापूर : चित्रपट कलादिग्दर्शक व छायाचित्रकार सुंदर दिलीप कांबळे (वय ४०) जे एसके या नावाने प्रसिद्ध होते, त्यांचे आज बुधवार ( दि.८ ) रोजी सकाळी अकाली निधन झाले.

फॅन्ड्री, भारतीय, जन-गण-मन या चित्रपटांसाठी सहाय्यक कलादिग्दर्शक म्हणून तसेच लेखक – दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या आगामी ‘ गाभ ‘ या चित्रपटासाठी कलादिग्दर्शक व निर्मिती प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, आईवडिल व मोठा परिवार आहे. जलदानविधी जत्राट येथे शुक्रवारी (दि. १०) सकाळी ९ वाजता आहे.