तो ‘ शिष्यच ‘ देणार का पवारांना टक्कर ? माढातून भाजपकडून लढण्यास इच्छुक

पुणे : दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली होती. त्यात माढामधील राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.

भाजपसह सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातील एक-एक लोकसभा मतदारसंघ टार्गेट करून रणनीती आखण्यात येत आहे. यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे.दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली होती. त्यात माढामधील राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.

त्यानंतर आता शरद पवार यांच्याच मुशीत शिकलेल्या नेत्याने भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने माढा लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू झाली आहे.भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वतः माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी आदेश दिला तर, मी निवडणूक लढवण्यास तयार आहे, असे ते म्हणाले आहेत.पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीला धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते.

या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपण माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचे बोलून दाखवले आहे.देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रातून जे ठरेलं तेच माढा लोकसभा मतदारसंघात होणार आहे. माढा लोकसभेची जबाबदारी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि माझ्यावर सोपवलेली आहे. वरून जो आदेश येईल तो आम्ही पाळत आहोत. पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितल्यास लोकसभेची निवडणूक नक्की लढणार, असंही ते म्हणाले.

🤙 8080365706