कोल्हापूर : भारतीय युद्ध कलेचे संपूर्ण जगाला आकर्षण आहे असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर राज्यस्तरीय युद्ध कला प्रात्यक्षिके आज मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आली.यावेळी संपूर्ण राज्यभरातील खेळाडूंनी युद्धकला प्रात्यक्षिकांचा ठराव सादर केला.विशेष म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पुढे सरसावत एका खेळाडूकडील लाठी घेतली आणि हलगीच्या गजरात मोठ्या उत्साहात लाठी चालविली.यावेळी खेळाडूंनी तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यासह सादर केलेल्या युद्धकला प्रात्यक्षिकांनी उपस्थित रोमांचित झाले.या कार्यक्रमाला मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार ,महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ,अभिनेते आनंद काळे आदी उपस्थित होते.
