अजितदादा भुजबळांना जरा समज द्या : मनोज जरांगे पाटील

अंतरवली : मी अजितदादांना विनंती करतो. त्यांनी छगन भुजबळांना जरा समज द्यावा, ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही. मग मी सोडत नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवली सराटी गावात भव्य सभा पार झाली. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन करत छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी मराठ्यांना उचकवायला सांगितले आहे. त्यासाठीच छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते बोलत आहेत. पण आम्ही मराठे शांततेच्या मार्गानेच लढू. उद्रेक जाळपोळ होणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय मागेही हटणार नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांनी आता घरात बसावे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.