कोल्हापूर : येथील राजर्षि शाहू गव्हमेंट व्हेंटस् को-ऑपरेटिव्ह बँक लि., कोल्हापूर या बँकेची 106 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रतिभानगर हौसिंग सोसायटी हॉल, सागरमाळ, कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाली. बँकेचे संचालक विलासराव कुरणे यांनी सर्व उपस्थित सभासदांचे स्वागत केले.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश रा. शिंदे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे विषयवार वाचनास प्रारंभ केला.
सुरवातीस अहवाल सालात निधन झालेल्या व्यक्तींना तसेच देशातील थोर व्यक्ती, लेखक, कवि, नेते, हितचितक, सभासद व ज्ञात, अज्ञात व्यक्ती ठेवीदार, मातृभूमीसाठी देश रक्षणार्थ धारातीर्थी पढलेले वीर जवान यांना अंतःकरणपूर्वक श्रद्धांजली वाहण्यात आली.प्रास्ताविकामध्ये बँकेचे अध्यक्ष अतुल जाधव यांनी बँकेने 106 वर्षे पूर्ण केली असून बँकेने 107 व्या वर्षांत पदार्पण केले आहे.
बँकेच्या सर्व सभासदांनी संचालक मंडळावर विश्वास दाखवून सहकार्य केलेबद्दल आभार मानले. आपल्या पारदर्शक कारभाराद्वारे बँकेने ठेवींचा चढता आलेख कायम ठेवलेला असून, बँकेने 200 कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून आज रोजी बँकेकडे 215 कोटी रुपये इतक्या ठेवी असल्याचे सांगितले.
बँकेने सलग तेरा वर्षे 0% (शून्य टक्के) एनपीए ठेवून बँकेने रक्कम 2 कोटी 19 लाख रुपये इतका विक्रमी नफा मिळविलेला आहे हे बँकेच्या प्रगतीचे व स्थैयाचे प्रतिक असल्याचे सांगितले.सभासदांना वितरीत करण्यात येणाऱ्या कर्जाची कमाल मर्यादा 18 लाखावरुन वाढवून कर्जाची कमाल मर्यादा 21 लाख इतकी करण्यात आलेली आहे. भविष्यात कर्जाची मर्यादा आणखीन वाढविणार असल्याचे नमूद करून निवडणूकीमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करणार असल्याचे यावेळी सांगितले.
अहवाल सालात बँकेस ऑडिट वर्ग “अ” तसेच रिझर्व्ह बँकेचे “ग्रेड-I” मानांकन असल्याचे सांगितले. पंचवार्षिक निवडणूकीमध्ये दिलेल्या आश्वासानांपैकी मयत कर्जदार सभासदांना सध्या 30% कर्ज माफी देण्यात येते. त्यामध्ये वाढ करुन कर्ज माफी 40% इतकी करण्यात येत असल्याचे सांगितले. भविष्यात मयत कर्जदार सभासदांना 100 % कर्ज माफी देण्याबाबतचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या विचाराधीन असल्याचे नमूद केले.