आदर्श गोरोबा मित्र मंडळ जयसिंगपूर गणेश विसर्जन मिरवणूक उत्सव 2023

शिरोळ(नामदेव निर्मळे) : जयसिंगपूर शहरात प्रथमच रशियन डि जे क्रिप्सी धुरळा उडवणार..गेली 40 वर्षे जयसिंगपूर शहरातच नाही तर शिरोळ तालुक्यातील एकमेव गणेश उत्सव सजीव देखावा असो किंवा विसर्जन मिरवणुक असो.. ते फक्त आदर्श गोरोबा मित्र मंडळचे नाव प्रसिध्द आणि नाव लौकिक आहे. ही 38 वर्षाची अखंडीत परंपरा चालू आहे. या वर्षी 2023 ची मिरवणूक सुध्दा तरुणांना नाचवणारी आहे.

रशियन डि जे स्क्रिप्सी च्या वाद्याने धुम धडाक्याने वाजणार ! ही मिरवणूक लांब लचक कंटेनर वर, अधुनिक लाईट सिस्टीम, अधुनिक साऊंड सिस्टम असणार आणि याला वाजवणारी सुध्दा रशियन लेडी असणार आहे. म्हणूनच दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि आदर्श गोरोबा मित्र मंडळची गणेश उत्सव मिरवणूक आगळी आणि वेगळी होणार.

हि मिरवणूक न भूतो.. न भविष्यती असीच होणार…आदर्श गोरोबा मित्र मंडळ अध्यक्ष कार्तिक मुल्या, उपाध्यक्ष मोबीन नदाफ, खजिनदार महेश लोणार,सेक्रेटरी शुभम मंटाले व पदाधिकारी कडून अगत्यपूर्व निमंत्रण आहे. जयसिंगपूर व जयसिंगपूर परिसरातील नागरिक, तरूण, तरूणी या मिरणूकीचा आनंद घेण्यासाठी आवर्जून यायच बर का… मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी 5 वाजता आदर्श गोरोबा मित्र मंडळ चौक 5 वी गल्ली पासून एतिहासिक दसरा चौक पर्यंत निघणार आहे.. असी माहीती आदर्श गोरोबा कला क्रिडा, सस्कृतिंक, सामाजिक, शैक्षणिक मंडळ संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष शिवाजी आण्णा कुंभार यांनी दिली आहे.