नवी दिल्ली : भारत सरकारने न्यूज चॅनेलसाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. गुन्हेगारी किंवा दहशवादाशी संबंध असणाऱ्या व्यक्ती किंवा अशा प्रकारच्या संस्थेशी संबंधित असलेल्या व्यक्तीला न्यूज चॅनेलमध्ये न बोलावण्याचे, तसेच अशा व्यक्तींना कसल्याही प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करुन न देणाच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
माहिती आणि प्रचारण मंत्रालयाने यासंदर्भात पत्र जाहीर केले आहे.दहशतवाद किंवा गुन्हेगारी यामध्ये सहभागी असलेल्या कोणालाही न्यूज चॅनलनी व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ नये. कायद्यानुसार बंदी घालण्यात आलेल्या संस्थेशी संबंधित लोकांनाही डिबेटसाठी बोलवण्यात येऊ नये.
संविधानाच्या कलम १९(२) मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या वाजवी निर्बंधानुसार हे निर्देश जारी करण्यात आलेत, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. कॅनडा आणि भारताच्या बिघडत्या संबंधांमध्ये चीनचा हात? कॅनेडियन पत्रकाराने केला गौप्यस्फोटदहशतवाद पसरवणाऱ्या लोकांना आपले रिपोर्ट किंवा मत/अजेंडा पसरवण्यासाठी न्यूज चॅनेलनी व्यासपीठ देऊ नये, असं केंद्र सरकारने पत्रात म्हटलंय.
एका न्यूज चॅनेलने दहशतवादाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि भारत सरकारने बंदी घातलेल्या संस्थेशी संबंधित एका परदेशी व्यक्तीला चर्चेसाठी बोलावलं होतं. त्यानंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.न्यूज चॅनेलमध्ये चर्चेसाठी आलेल्या व्यक्तीने अनेक वादग्रस्त वक्तव्य केले होते. भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता याबाबत व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे जनमत कलुषित झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
गुंतवणूकदारांना मोठा झटका!
भारत कॅनडा वादात महिंद्राने कॅनडामधील व्यवसाय केला बंददरम्यान, भारत आणि कॅनडामध्ये संबंध ताणले गेले आहेत. कॅनडातील एका दहशतवाद्याची भारतीय सुरक्षा यंत्रणेने हत्या केल्याचा आरोप पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. त्यानंतर दोन्ही देशातील राजनैतिक संबंध अत्यंत खालावले आहेत. कॅनडातील कट्टरतावादी आणि फुटीरतावादी नेत्यांनी भारता विरोधात अनेक वक्तव्य केली आहेत.