मुंबई : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या स्टाईल आणि प्रतिक्रियांसाठी चर्चेत असतो. सलमानच्या घरचा गणपती उत्सव हा त्याच्या तमाम चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय असतो.तो व्हिडिओ अर्पिता आणि आयुषच्या घरातील असून त्यावरुन सलमानला आता नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.
त्याच्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी त्याला धर्मावरुन सुनावले आहे. सलमाननं गणरायाची आरती केली आहे. तो व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. सलमानच्या घरी देखील गणरायाचे आगमन होत असते. त्यावरुनही त्याला अनेकदा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
मात्र काही नेटकऱ्यांनी यंदाही सलमानला त्यावरुन ट्रोल केले आहे.सलमानच्या बहिणीच्या अर्पिताच्या घरी बाप्पाचे आगमन झाल्यानंतर एक व्हिडिओ इंस्टावरुन शेयर केला आहे. त्यावरुन तो चर्चेत आला आहे. त्याच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. त्याचे कारण म्हणजे सलमाननं सहकुटूंब सहपरिवार केलेली गणेशाची आरती. त्यावरुन काही नेटकऱ्यांनी भाईजानवर आगपाखड केली आहे. त्याला तू आता इस्लामच्या नावावर कलंक आहे. असेही म्हटले आहे.