प्राथमिक आरोग्य केंद्र कळे येथे आयुष्यमान भव मोहीमेस प्रारंभ

.
कोल्हापूर (प्रतिनिधी) प्रार्थमिक आरोग्य केंद्र कळे तालुका पन्हाळा येथे आयुष्मान भव मोहिमेचा प्रारंभ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सुभाष सर्जेराव पाटील यांच्या शुभहस्ते व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौ एल. बी. सरोळे यांचे उपस्थितीत प्रारंभ करणेत आला.
सदर मोहीम १ सप्टेंबर 2023 ते ३१ डिसेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड, गावोगावी आयुष्यमान सभा घेणे दर शनिवारी उच्च रक्तदाब ,डायबिटीस कॅन्सर रुग्ण तपासणी व उपचार, क्षयरोग कुष्ठरोग तपासणी उपचार, शालेय विद्यार्थी अंगणवाडी विद्यार्थी तपासणी उपचार , तसेच गावोगावी प्राणायाम शिबिर, गरोदर माता साठी शिबिर, सर्व आरोग्य तपासण्या, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणी ,मुत्र तपासणी अवयव दान जागृती मोहीम हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र कळेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एल. बी. सरोळे यांनी यावेळी दिली. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आव्हान त्यांनी केले. आरोग्य पर्यवेक्षक जी. एम. भास्कर, पी डी भास्कर, मिलिंद गुळवणी,तेंडुलकर परिचारिका स्वाती बुरुड, वाहन चालक सतीश बुरुड, डेव्हिडर सावंत ,तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अवयव दान प्रतिज्ञा ही घेण्यात आली.

🤙 8080365706