मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
या बैठकीत सर्वपक्षीय नेते चर्चा करतील. त्यानंतर यातून काही मार्ग निघतो का, हे पाहावं लागेल. अजित पवार म्हणाले, मराठा समाजाला कुणबी समाजाला आरक्षण देण्यास काही ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतून जरांगे पाटील यांच्या मागणीवर काही निर्णय घेता येतो का, त्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात बोलताना आंदोलन मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमचं आंदोलन हे सरकारच्या विरोधात नाही. विरोधी पक्षांच्या विरोधात आमचे आंदोलन नाही. राजकारण्यांचे आंदोलन नाही. सर्वसामान्य मराठ्यांनी हे आंदोलन उभे केले आहे.