
दिल्ली : मोगल सरदार अफजल खानाचा कोथळा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे येत्या 16 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये आणण्यात येणार आहेत. राज्याचे वन तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात माहिती दिली.
ही वाघनखे लंडनमधील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली. आता भारतात, प्रामुख्याने महाराष्ट्रात ती परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. संग’हालयाने या करारात काही अटी सुद्धा समाविष्ट केल्या आहेत. संबंधित वाघनखे कुठेही फिरवता येणार नाहीत. ती संग’हालयात एकाच ठिकाणी ठेवण्यात यावीत. त्याचा विमा काढण्यात यावा, जेणेकरून चोरी होणार नाही आदींचा समावेश आहे. याशिवाय वाघनखांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना सुद्धा करारात समाविष्ट कराव्या लागणार आहेत. देशाची आणि महाराष्ट्राची अस्मिता असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखे महाराष्ट्रात परत आणण्यात येणार असल्याचा सर्वांनाच आनंद आहे.
