आवश्यक सोयीसुविधांकरिता नगरपंचायतींसाठी 21.3 कोटी रू. निधी: पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयातील शहरी भागात पायाभूत सुविधांच्या निर्मितीतून सर्वसामान्यांना विविध योजनांच्या माध्यमातून कामे करण्यासाठी 6 नगरपंचायतींच्या मागणीनंतर नगरोत्थान व इतर योजनांमधून 21.3 कोटी रुपये निधी देण्याचे पालकमंत्री तथा मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा, दीपक केसरकर यांनी जाहीर केले.

महाराष्ट्राच्या नागरी क्षेत्रात पाणी पुरवठा, मलनिस्सारण, रस्ते अशा विविध पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने विविध योजनांमधून निधी दिला आहे. यातून पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हयातील भेटी दिलेल्या 6 नगरपंचायतींना सुमारे 21.3 कोटी रूपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. त्यांनी दोन दिवसात जिल्हयात 6 नगरपंचायतींना भेटी देवून सर्वसामान्यांच्या विकास कामांबाबतच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी सोबत खासदार धैर्यशील माने, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासह, नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, संबंधित तहसिलदार, मुख्याधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दि.8 सप्टेंबर रोजी त्यांनी वडगाव नगरपरिषद विकास कामांबांबत तेथील कार्यालयात बैठक घेतली. माजी पदाधिकारी व मुख्याधिकारी यांनी विविध कामांबाबत शासनाकडे निधीची मागणी केली. नगरोत्थान व डीपीसीमधून मिळत असलेल्या 99 लक्ष रूपयांच्या निधीत वाढ करत पालकमंत्री यांनी 2.20 कोटी रूपये देण्याचे जाहीर कले. तसेच सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 8 कोटी रूपये लागणार आहेत. यासाठी शासनाकडून निधी येईपर्यंत काम थांबू नये म्हणून जिल्हा पर्यटन लेखाशीर्षमधून 1 कोटी रूपये देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले.

तेथील पंतप्रधान आवास योजनेसाठी 520 घरकुलांच्या जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावणेबाबतही जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या. हातकणंगले नगरपंचायतीत 1.38 कोटी रुपये निधी शासनाकडून मिळत होता, त्यात वाढ करत तब्बल 3 कोटी रूपये देण्याचे आश्वासन पालकमंत्री केसरकर यांनी दिले. तसेच नव्याने स्थापन झालेल्या सर्वच नगरपंचायतींना प्रोत्साहनात्मक शासनाकडून निधी मिळतो. त्याअंतर्गत ५ कोटी रूपये शासनाकडून अद्याप न मिळाल्याने त्याची मागणी यावेळी झाली. हातकणंगले नगरपरिषदेला तो निधी मिळण्यासाठी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.हुपरी येथील नगरपरिषदेला स्व:मालकीची इमारत नाही, ज्येष्ठांसाठी विरंगूळा केंद्र, नगरोत्थानमधून वाढीव निधी मिळावा, पाण्याच्या योजनेबाबत तसेच सिटी सर्वेच्या दुरूस्तीबाबत मागण्या नागरिकांनी केल्या. यावेळी पालकमंत्री महोयदयांनी 83.5 लाख रूपयांच्या निधीत वाढ करत 2.10 कोटी रुपये निधी देण्याचे जाहीर केले.

🤙 8080365706