
मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसानं सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळं पिकांना काहीसा आधार मिळाला आहे. आज कोकणासह संपूर्ण विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, अकोला, नागपूर, गडचिरोली, चंद्रपुर, भंडार गोंदिया अमरावती जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.तसेच मराठवाड्यातील संभाजी नगर. जालना, परभणी, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुर, नगर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. तर कोंकणातील पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच उद्या ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी तर पुणे, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
