२०२४ ची दहीहंडी नरेंद्र मोदींच फोडणार: मुख्यमंत्री

मुंबई : मुंबईत नेहमीच्या उत्साहात दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज आहेत. ठाण्यातील टेंभी नाका मित्रमंडळाच्या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.तसेच २०२४ ची दहीहंडी नरेंद्र मोदींच फोडणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

राज्य सरकार ज्याप्रमाणं विकासाचे थर लावत आहे, त्याचप्रमाणं इथले गोविदा पथकांकडून विकासाचे थर लावले जात आहेत. अहंकाराचे थर कोसळले आणि विकासाचे, प्रगतीचे थर आता सुरु झालेले आहेत. देशात आणि राज्यात मोदींविरोधात सर्व इंडिया आघाडीचे लोक एकत्र येत आहेत. ते कितीही एकत्र आले तरी २०२४ ची लोकसभेची हंडी नरेंद्र मोदींच फोडतील, असा विश्वास सर्व देशवासियांना आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

🤙 8080365706