
मुंबई : चित्रपट सृष्टीतील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मल्याळम चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक जॉय मॅथ्यू याचा अपघात झाला आहे.
सोमवारी रात्री केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात महामार्गावर प्रवास करतांना त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघात ते जखमी झाले आहेत. या अपघाताबद्दल पोलिसांनीही माहिती दिली.
या अपघाताबद्दल मिळालेली माहिती अशी की,”मॅथ्यूचा ही ड्रायव्हर कार चालवत होता. त्यावेळी हा अपघात झाला. यात मॅथ्यूच्या नाकाला दुखापत झाली आहे, तर व्हॅन चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर पिकअप व्हॅनचा चालक वाहनात अडकला होता, त्याला अग्निशमन विभागाने स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले. सध्या दोघांची प्रकृती स्थीर आहे.