
गडहिंग्लज : जालना येथे मराठा आरक्षण आंदोलकावर लाठीमाराच्या निषेर्धात आज सकल मराठा समाज वतीने गडहिंग्लज येथे बंद ची हाक दिली होती.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज बांधव एकत्र आले होते. या आंदोलनात आमदार सतेज पाटील यांनी सहभाग घेत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी जनसंवाद यात्रेची शहरातील पदयात्रा रद्द करून सकल मराठा समाजाला पाठींबा व्यक्त केला.
आ. सतेज पाटील जनसंवाद यात्रेच्या निमिताने गडहिंग्लज तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी आमदार सतेज पाटील यांनी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. आणि गडहिंग्लज बंदला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी अमर चव्हाण किरण कदम बंटी कोरी शिवाजीराव खोत अँड दिग्विजय कुराडे,विद्याधर गुरबे, बसवराज आजारी अंजना रेडेकर यांच्यासह गडहिंग्लज परिसरातील विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
