उद्या कोल्हापूर बंद

कोल्हापूर : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमार आणि गोळीबाराच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. ५) कोल्हापूर शहर बंद ठेवण्यात येणार आहे .

मंगळवारी सकाळी दहा वाजता दसरा चौकात आंदोलक जमणार आहेत.एसटी केएमटी, रिक्षा, व्यापारी व्यावसायिक आणि सर्व फेरीवाल्यांनी बंद ठेवून कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी दहा वाजता दसरा चौकात एकत्र येण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. दसरा चौकातून मोटर सायकल रॅलीव्दारे बंदचे आवाहन करण्यात येणार आहे.

जालना येथे झालेल्या गोळीबार आणि लाठीहल्ल्याचा जाब विचारण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे सोमवारी जबाब दो आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, विजय देवणे, सुनील मोदी, रविकिरण इंगवले, आदिल फरास, गणी आजरेकर, दिलीप देसाई यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

🤙 8080365706