एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याकाठी 25 लाख रूपये द्यायचा: नारायण राणे

मुंबई : एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याकाठी 25 लाख रूपये द्यायचा असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचा ‘शिवसेना लोकाधिकार आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी नारायण राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते.नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी माझं तोंड उघडायला लावू नये. अन्यथा ‘मातोश्री’चा दरवाजा उघडणार नाही. एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याला 25 लाख रूपये द्यायचा. तसेच ज्यावेळी सहारा हॉटेलमधून 140 मराठी कामगारांना काढण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दगडफेक करायला लावली आणि बदल्यात तडजोड करत एका कामगारामागे 4 लाखांप्रमाणे 7 कोटी रूपये घेतले असा आरोप करत नारायण राणेंनी खळबळ उडवून दिली आहे.

🤙 8080365706