
मुंबई : भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे श्रीगोंद्यात आता पाचपुते विरुद्ध पाचपुते असा राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे शिवसेना ठाकरे गटात आज प्रवेश करणार आहेत.
साजन पाचपुते हे आज सायंकाळी पाच वाजता मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे राज्यात आणखी एका काका विरुद्ध पुतण्याची राजकीय लढत पाहायला मिळू शकते. कारण साजन पाचपुते यांना ठाकरे गटात मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
